नाणार प्रकल्पाबद्दल लोकभावना लक्षात घेऊन हा प्रकल्प करणं आमची जबाबदारी -काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
नाणार हा प्रकल्प कोकणासाठी किती महत्त्वाचा आहे, त्याबद्दल तिथल्या लोकांनी माझ्यासमोर भूमिका मांडली. प्रकल्प येण्याच्या आधीच गुजरातच्या उद्योगपतींनी शेतकऱ्यांची जमीनही घेऊन टाकली, अशा पद्धतीच्या तक्रारी आल्या.
तिथला मच्छिमार असो, शेतकरी असो किंवा बेरोजगार असोत या कोणावरही अन्याय होता कामा नये, अशी आमची भूमिका आहे.असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडले आहे
नाणारसारख्या प्रकल्पांमुळे त्या भागात रोजगाराची व्यवस्था मोठ्या प्रमाणावर होत असेल आणि कोकणातील लोकांना मुंबईत येऊन काम करण्याऐवजी त्यांच्या गावातच काम मिळत असेल तर हा प्रकल्प व्हावा अशी लोकांची भावना आहे लोकभावना लक्षात घेऊन प्रकल्प करणं आमची जबाबदारी आहे त्यासाठी काँग्रेस पुढाकार घेईल असेही त्यांनी सांगितले .नाणारबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू असेही पटोले म्हणाले आहेत
www.konkantoday.com