गुहागर येथील निरामय रुग्णालय नियमित सुरू करण्याची मागणी
गुहागर येथील निरामय रुग्णालय नियमित सुरू करण्याची मागणी मतं पुढे येत आहे.गुहागर तालुक्यात एकही सर्व सुविधायुक्त रुग्णालय नसल्याने केवळ कोरोनातच नव्हे तर सगळ्याच आजारांमध्ये आरोग्य सुविधा न मिळाल्याने गेली अनेक वर्षे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाच्या निमित्ताने का होईना निरामय रुग्णालय सुरू झाले तर तालुक्यासाठी लाइफ लाइन ठरू शकते. तब्बल २० वर्षांनी सुरू होणारे हे रुग्णालय आता तरी नियमित सुरू राहावे, अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.याठिकाणी रुग्णालय सुरू करण्याच्या दृष्टीने नामदार उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांनी नुकतीच भेट दिली होती
www.konkantoday.com