कोरोनात पालकत्व गमावलेल्या मुलांना एसीबी इंटरनॅशनल स्कूलमध्ये मोफत शिक्षण
चिपळूण: चिपळूणजवळील कापसाळ येथील एसीबी इंटरनॅशनल स्कूलने कोरोना काळात पालकत्व गमावलेल्या चिपळूण तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.अशा प्रकारचा महत्वाकांक्षी निर्णय घेणारी रत्नागिरी जिल्हयातील ही पहिलीच शाळा ठरली आहे. दिल्ली बोर्डाचे सीबीएसई पॅटर्न शिक्षण देणाऱ्या चिपळूणमधील इंडियन सायंटिफिक एज्युकेशन सोसायटीच्या लोकप्रिय एसीबी इंटरनॅशनल स्कूल आणि एसीबी प्ले स्कूलच्यावतीने कोविड १९ काळात पहिल्या लाटेपासून कोरोना व्हायरसमुळे पालकत्व हरपलेल्या मुलांना संपूर्ण शिक्षण आणि त्यात दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा मोफत देण्याबाबत एसीबी इंटरनॅशनल स्कूल संचालक मंडळांची चेअरमन अँड.अमोल भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी बैठक संपन्न झाली या वेळी हा निर्णय घेण्यात आला.
www.konkantoday.com