
कशेडी घाटात रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणार्या एका खासगी बसवर पोलिसांची कारवाई,एक प्रवासी कोरोना बाधित आढळला
रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाटात गुरुवारी सकाळी रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणार्या एका खासगी बसवर पोलिसांनी कारवाई केली. या बसमधून प्रवास करणार्या २९ जणांची आरोग्य विभागाच्या पथकाने तत्काळ अँटिजेन चाचणी केली. त्यात एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ९ जून पर्यंत रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत. गुरुवारी ३ रोजी सकाळी कशेडी घाटात पोलिसांची नाकाबंदी सुरू असताना खासगी आराम बस (एम. एच. 03 सिव्ही 3150) थांबवली असता चालकाकडे व प्रवाशांकडे जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी आवश्यक परवानगी आढळून आली नाही. त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली
www.konkantoday.com