
भाजपाचे उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष केदार साठे यांनी उत्तर रत्नागिरीच्या कार्यकारणीची केली घोषणा
भाजपाचे उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष केदार साठे यांनी पत्रकार परिषदेत जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली. या कार्यकारिणीमध्ये आठ उपाध्यक्ष, चार सरचिटणीस, सात चिटणीस, २५ आघाडी सेल पदांवर तसेच १८ विशेष निमंत्रितांचा अशा ८७ जणांचा समावेश असलेली जम्बो जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली.
भाजपाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी उपाध्यक्ष म्हणून नागेश धाडवे (खेड), रामदास राणे (चिपळूण), लक्ष्मण शिगवण (गुहागर), विनोद चाळके (लोटे), निशिकांत भोजने (चिपळूण), आशिष खातू (चिपळूण), जया साळवी (दापोली), कोमल खेडेकर (खेड) यांची निवड केली आहे. सरचिटणीसपदी नीलम गोंधळी (मार्गताम्हाणे), विश्वदास लोखंडे (मंडणगड), श्रीराम इदाते (जालगाव), विठ्ठल भालेकर (गुहागर) यांची तर चिटणीसपदी भूषण काणे (खेड), विनोद भोबसकर (चिपळूण), प्रतिज्ञा कांबळी (चिपळूण), गणेश हळदे (चिपळूण), संतोष मालप (चिपळूण), वैशाली मावळणकर (गुहागर), गजानन पेठे ( दापोली) यांची कोषाध्यक्ष, संदेश ओक
(चिपळूण) यांची प्रसिद्धीप्रमुख, अतुल गोंदकर (दापोली) यांची युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, सुरेखा खेराडे (चिपळूण) यांची महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष आदींची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
माजी आमदार डॉ. विनय नातू, प्रशांत शिरगावकर, रश्मी पालशेतकर, विनोद सुर्वे, स्मिता जावकर, प्रिया दरीपकर, परशुराम जोशी, लहू साळुंखे, पांडुरंग पाष्टे, वसंत गोंधळी, वैशाली निमकर,विजय चितळे, मंगेश जोशी, आशिष जोगळेकर, डॉ. अजित भोसले, मिलिंद जाडकर, दीप्ती असगोलकर, संतोष वरेकर यांची विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
www.konkantoday.com