संभाजीराजे छत्रपती यांचे शिवभक्तांना घरीच थांबण्याचं आवाहन
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या संभाजीराजे यांनी २ दिवसांपूर्वी शिवभक्तांना मिळेल त्या वाहनाने रायगडाकडे कूच करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, आता संभाजीराजे छत्रपती यांनी शिवभक्तांना घरीच थांबण्याचं आवाहन केलं आहे. दुर्दैवानं यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा सर्वांनी घरातूनच साजरा करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. तसंच तुम्हा सर्वांच्या न्यायाची बाजू आणि पुढील दिशा, ठरल्याप्रमाणे राजसदरेवरुन घोषित करेन, असं आश्वासनही त्यांनी मराठा बांधवांना केलं आहे.
www.konkantoday.com