राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत’, असं राज्याच्या आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्टनिर्णयाबाबतही मंत्र्यांमध्ये व खात्यात एकमत नाही
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्य अनलॉकची घोषणा केली. त्यामध्ये राज्यातल्या सर्व जिल्ह्यांची वर्गवारी देखील सांगितली. या घोषणेनुसार उद्यापासून म्हणजेच शुक्रवार ४ जून पासून अंमलबजावणी सुरू होईल, असं देखील जाहीर केलं. मात्र, त्यानंतर आता राज्य सरकारनंच हा निर्णय अद्याप झालेला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘करोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल.राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत’, असं राज्याच्या आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
‘ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे. या पुढे जाताना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे अधिसूचित करण्यात येतील’, असं देखील आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे
यामुळे असे निर्णय जाहीर करताना महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये व खात्यांमध्ये एकमत नसल्याचे परत एकदा स्पष्ट झाले आहे
www.konkantoday.com