रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नेमके कोण हे शासनाने जाहीर करावे -माजी आमदार विनय नातू
रत्नागिरी जिल्ह्यासाठी सरकारने दिलेल्या पालकमंत्र्यांशी जिल्ह्याच्या प्रशासनाचा ताळमेळ जमत नाही का?तसेच सरकाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी नेमून दिलेले पालकमंत्री जिल्ह्यात कधी फिरकत नाहीत मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री येथील कारभार पाहतात.तसेच जिल्ह्यातील निर्णयही तेच घेतात यामुळे नेमके जिल्ह्याचे पालकमंत्री कोण हे सरकारने एकदा घोषित करावे असा सवाल माजी आमदार डॉ विनय नातू यांनी ठाकरे सरकारला केला आहे
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री कधीच जिल्ह्यात येत नाहीत आणि येथील निर्णय हे अन्य जिल्ह्याचे पालकमंत्री घेतात.यामुळे नक्की या जिल्ह्याचे पालकमंत्री तरी कोण?किंबहुना या जिल्हयासाठी पालकमंत्री आहेत की नाही हे सरकारने एकदा घोषित करावे असेही नातू यांनी यांनी म्हटले आहे
www.konkantoday.com