खेडमध्ये आजपासून कडक लॉकडाउनची अंमलबजावणी सुरु ; कशेडी येथे पोलिसांचा कडक बंदोबस्त

खेड : कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून ९ जूनपर्यंत कडक लॉक डाउनची अंमलबजावणी सुरु झाली असल्याने खेडची बाजारपेठ ओस पडली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेश द्वार असलेल्या कशेडी येथून बाहेरील एकही वाहनाला प्रवेश दिला जात नसल्याने नेहमी धावणारा महामार्ग थांबला आहे. या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
१ जानेवारीपासून राज्यात कोरोनाचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत मात्र राज्यातील जे तालुके रेडझोन मध्ये आहेत तिथले निर्बंध मात्र आवश्यकतेनुसार आणखी कडक करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हा हा त्या पैकीच एक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये कोरोनबाधितांची संख्या वाढतच चालली असल्याने प्रशासनाला जिल्ह्यात कडक लॉकडाउन चा निर्णय घ्यावा लागला असून आजपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.
खेडचे प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांनी दिलेल्या माहितीनुसार ३ ते ९ जानेवारी दरम्यान जिल्ह्यात पर्यायाने तालुक्यात कडक लॉक डाउन असणारा आहे. या दरम्यान मेडिकल इमर्जन्सी व अंत्यसंस्कार या दोन बाबी वगळता जिल्ह्यात कुणालाही प्रवेश दिला जाणार आहे. जिल्ह्यात प्रवेश करू इच्छिणाऱ्या व्यक्तीकडे आरटीपीसीआर टेस्ट केल्याचे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. दुधाची डिलिव्हरी वगळता इतर कोणत्याही वस्तूची ने आण करता येणार नाही. या दरम्यान कोणते व्यवसाय सुरु ठेवता येथील याची यादी जाहीर केलेली आहे. त्या व्यतिरिक्त अन्य सर्व व्यवस्थापने बंद राहतील. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या कडक निर्बंधाचे नागिरकांनी पालन करावे, जे या नियमनाचे भंग करतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असही सोनोने यांनी म्हटले आहे.
कडक लॉक डाउन च्या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही ठिकठिकाणी नाकेबंदी केली आहे. जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी येथे पोलीस प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करत आहेत. कुणालाही जिल्ह्यात प्रवेश न देण्याचे आदेश असल्याने या ठिकाणी वाहन चालक आणि पोलीस यांच्यामध्ये शाब्दिक खटकेही उडू लागले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button