कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत सर्व नियमांची अंमलबजावणी केल्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील कानरकोंड गाव राहिले कोरोनामुक्त

मार्च २०२० पासून जून २०२१ या एक वर्ष ३ महिन्याच्या कालावधीत संगमेश्वर तालुक्यातील कानरकोंड गावाने अनेक उपाययोजना केल्या आणि त्याची अंमलबजावणी केली त्यामुळे आज हे गाव कोरोनामुक्त होण्यात यशस्वी ठरले.
करण्यात आलेल्या उपाययोजना
▪️ बाहेरील व्यक्ती गावामध्ये प्रवेशबंदी, गावातील व्यक्ती बाहेर जाण्यास पूर्णतः बंदी
▪️ फेरीवाल्यांना प्रतिबंध
▪️ जीवनावश्यक वस्तू मध्ये भाजीपाला, किराणा, औषधे गावातील व्यक्तींमार्फत व्यवस्था करून यादीप्रमाणे घरपोच पोचवणे, सॅनिटायझर मारणे, आंघोळ करणे त्या व्यक्तींनी इतर व्यक्तीच्या संपर्कात न येणे
▪️ निराधार व्यक्ती उपाशी राहू नयेत म्हणून आंबेड बु. शाळा नं २ च्या शिक्षकांनी किराणाचे वाटप केले.
▪️ गावातील लग्न समारंभ शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे करणे
▪️ धार्मिक कार्यक्रम, सार्वजनिक जेवणावळी पूर्णतः बंद
▪️ सामूहिक रित्या फिरणे बंद
▪️ घरोघरी जावून प्रत्येक व्यक्तीची तपासणी करणे, धीर देणे
▪️मार्गदर्शक सूचना फलक लावणे
▪️ गावात वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे कोसुंब येथील डॉ. भोसले यांची तिथे व्यवस्था करणे
▪️ होळीवंत, आंबेवंत, वनिवंत धनगरवाडी, गवळीवाडी आदी वाडीवस्ती वर जाऊन जनजागृती करणे
▪️ लसीकरणाबाबत गैरसमज दूर करून ८५ % लसीकरण केले
▪️ क्वारंटाईन चाकरमान्यांच्या राहण्याची, खाण्याची, आंघोळीची, मनोरंजनाची व्यवस्था करणे यासाठी ग्रामविकास मंडळ व स्थानिक ग्रामस्थांनी४५ हजार रुपयांचा खर्च केला
तसेच ग्रुप ग्रामपंचायत आंबेड बु च्या वतीने सरपंच नुतन शिगवण यांनी सॅनिटायझर, मास्कचे वाटप केले. कोरोनाला रोखण्यात यश मिळवल्या बद्दल, उपसरपंच, ग्रा.पं. सर्व सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्यसेवक, आशासेविका, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, ग्राम कृतीदल व सर्व ग्रामस्थांचे सरपंच नूतन शिगवण यांनी आभार मानले.

कानरकोंडचे गावकर सुभाष कानर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,आमच्या गावची ग्रामदेवता अंत्राळदेवी हीच्या कृपाशिर्वादामुळेच आम्ही कानरकोंडवासिय या महामारीला रोखू शकलो. आजूबाजूच्या गावांमध्ये रुग्ण सापडताहेत, शिवाय मृत्यूही होताहेत. तरीही आम्ही सुरक्षित आहोत. एवढच नव्हे तर कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबई, पुणे, कोल्हापुर, गुजरात, बेंगलोर अशा ठिकाणी आमची मुल कामानिमित्त आहेत, परंतु त्या ठिकाणीही आमचा एकही कोरोना बाधीत व्यक्ती सापडलेला नाही. या साठी माझ्या गावातील स्थानिक व मुंबईस्थित ग्रामस्थ व लोक प्रतिनिधी यांच्यामुळे शक्य झाले, असे त्यांनी सांगितले.

वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी शिवकुमार फास्के यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, येथील ग्रामस्थांचे कौतुक करायला हवे, कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत सर्व नियमांची अंमलबजावणी केल्यामुळे एकाही रुग्णाची नोंद वांद्री प्रा. आरोग्य केंद्रात झालेली नाही. असा आदर्श अनेकांनी घेतला तर लवकरच कोरोना हद्दपार होईल.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button