कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू
कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी ते रोहा विद्युती करणाची रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) तपासणी झाली आहे विजेवर चालवत इंजिन व काही डब्यांच्या गाडीची चाचणी घेण्यात आली या पथकाचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर काही दिवसातच विजेवर गाड्या सुरु करता येणार आहेत.
कोकणचा प्रवास वेगवान होण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कोकण रेल्वेच्या मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे. त्यामुळे लवकरच कोकणचा प्रवास हायटेक आणि प्रदूषणमुक्त होणार आहे.
संपूर्ण कोकण मार्गावर विजेवरील गाडय़ांचा प्रवास डिसेंबरपर्यंत सुरू होईल, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी दिली आहे.
www.konkantoday.com