कापरे आरोग्य केंद्रातील टीम ने गावात जाऊन लोकांच्या घरी कोरोना टेस्ट केल्याने लोकांचा त्रास वाचला
प्राथमिक आरोग्य केंद्र कापरे अंतर्गत गावातील कोरोणा ग्रस्त रुग्णांच्या सहवासातील लोकांच्या टेस्ट कराव्या लागतात त्या साठी सबंधील लोकांना आरोग्य केंद्रात यावे लागते परंतु आरोग्य केंद्रात येण्या साठी गाडी तसेच जाण्या येण्या साठी चा वेळ या गोष्टींचा विचार करून आरोग्य केंद्रातील टीम द्वारे सदर व्यक्ती आरोग्य केंद्रात तपासणीसाठी येण्याची वाट न बघता गावात जाऊन त्यांच्या घरातच टेस्ट केल्या जात आहेत. या मुळे लोकांचा वेळ तर वाचत आहे परंतु संपर्कातील लोक असल्याने वाहन भेटत नाही येणार कसे या गोष्टीला पूर्ण विराम मिळाला आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ ज्योती यादव, वैद्यकीय अधिकारी डॉ अंकुश यादव आरोग्य सहाय्यक परशुराम निवेंडकर यांच्या मार्गदर्शनखाली आरोग्य केंद्रात अनेक नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत त्यातील या नवीन उपक्रमाचे ही लोकांनी कौतुक करून वेळ व पैसा वाचवून गैरसोय दूर केल्या मुळे कर्मचाऱ्यांचे आभार मानत आहेत.
www.konkantoday.com