आता बंद दुकानाचे महावितरणने अँव्हरेज बिल काढल्याने वाढीव बिलामुळे व्यापारी हैराण
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकारने गेल्या महिनाभर लॉकडाऊन घातला असून, अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या बंद दुकानांचे मीटर रीडिंग घेता न आल्यामुळे त्यांना ‘अॅव्हरेज’प्रमाणे बिल देण्यात आले आहे. मात्र, विजेचा वापरच झालेला नसताना आलेले बिल नेहमीच्या वापराच्या बिलाच्या दुप्पटीहून अधिक असल्याने व्यापारी हैराण झाले आहेत
www.konkantoday.com