मुंबई गोवा महामार्गावर आवाशी येथे मागे येणाऱ्या टँकरने युवकाला चिरडले

खेड : मुंबई गोवा महामार्गावर आवाशी येथे रिव्हर्सने येणाऱ्या टँकरने पादचारी युवकाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दुपारी सव्वादोन वाजता घडलेल्या या अपघातात मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव अभिजीत पवार असून तो तालुक्यातील चिंचवली येथील रहिवाशी होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी येथील हिंदुस्थान युनिलिव्हर या कारखान्यात कच्चा माल घेऊन टॅंकर आला होता. कारखान्याचा गेट चालकाच्या लक्ष्यात न आल्याने तो थोडासा पुढे गेला. आपण गेटच्या पुढे आलो आहोत हे चालकाच्या लक्ष्यात आल्यावर त्याने आपल्या तब्यातील टँकर मागे घ्यायला सुरवात केली.
टँकरमध्ये क्लीनर नसल्याने त्याला टँकरच्या डाव्या बाजूने चालत असलेला पादचारी अभिजीत पवार हा दिसला नाही. पुढे गेलेला टँकर मागे येत आहे हे अभिजीत याच्या लक्ष्यात आले मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. प्रत्यक्षदर्शीनी सांगितल्यानुसार अभिजीत याने बाजूला होण्याचा प्रयत्न केला मात्र काही कळायच्या आताच त्या महाकाय टँकरने अभिजीतला धडक दिली. या अपघात त्याच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.अभिजीत याच्या कपड्यांच्या खिशात सापडलेल्या आयडेंटी कार्ड वरून तो बीव्हीजी या कंपनीचा कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसानी सांगितले.
टँकर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खेड पोलीस य प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button