आता बारावीच्या परीक्षा देखील रद्द होणार,आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठवला जाणार
राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता बारावीच्या परीक्षा देखील रद्द होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बारावीच्या परीक्षा संदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाली. बारावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. आज १२ च्या परीक्षा संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. १२ ची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठवला जाईल.त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
www.konkantoday.com