रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारी नौका समुद्र किनाऱ्यावर
कोकणातील महत्त्वाचा व्यवसाय म्हणून मासेमारीकडे पाहिले जाते.
पावसाळी मासेमारी बंदी आज मंगळवारपासून सुरू होत आहे. ही मासेमारी १ जूनपासून बंद झाली असली तरी रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश मासेमारी १५ मे पासूनच बंद झाली आहे. तोक्ते चक्रीवादळाच्या धोक्याच्या इशार्यामुळे सर्व मच्छीमार नौका १४ मेपासूनच बंदरात येऊन स्थिरावू लागल्या हाेत्या तोक्ते चक्रीवादळाचा धोका संपल्यानंतर यातील बहुतांश नौका पुन्हा समुद्रात मासेमारीसाठी गेल्याच नाहीत.
रत्नागिरी जिल्ह्यात ट्रॉलिंग, गिलनेटसह सर्व पारंपरिक नौका, पर्ससीन आणि मिनी पर्ससीननौका अशा एकूण सुमारे ४हजार ३०० मच्छीमार नौका आहेत.
www.konkantoday.com