
लॉकडाऊनबाबतच्या प्रशासनाच्या आदेशाविरोधात व्यापारी महासंघाच्या भूमिकेनंतर जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष
रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने लावलेल्या अर्धवट लॉकडाऊनला रत्नागिरी तालुका व्यापारी महासंघाने विरोध केला असून
प्रशासनाने २४ तासात निर्णय बदलावा अन्यथा दुकाने आणि हॉटेल्स सुरू करणार असा इशारा दिला आहे
जिल्हा प्रशासनाचा कागदावर असलेला लॉकडाऊन आता व्यापारी सहन करणार नाहीत. कडक लॉकडाऊन ची प्रत्यक्ष अंमलबजावणी आवश्यक आहे.रेल्वे वाहतूक, औद्योगिक वसाहत(MIDC), एस. टी. वाहतूक, खासगी कार्यालये, बँका इत्यादी सुद्धा बंद ठेवावे. केवळ दुकाने बंद ठेऊन कोरोनाचे संक्रमण आटोक्यात येणार नाही त्यामुळे असल्या अर्धवट लॉकडाऊन ला व्यापाऱ्यांचा ठाम विरोध असल्याचे व्यापा यांचे म्हणणे आहे प्रशासनाने आदेश रद्द करून रुग्णांचा विचार करून दूध, भाजीपाला व मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने, आस्थापना, बँका, खासगी कार्यालये, रेल्वे व एस. टी. वाहतूक, औद्योगिक वसाहत (MIDC) हे सर्व बंद करण्याचे आदेश प्रशासनाने २४ तासात काढावे अन्यथा २ जूनपासून सर्व व्यापारी आपली दुकाने व हॉटेल्स सुरू करतीलअसा इशारा दिला हाेता प्रशासनाच्या कालच्या या निर्णयाविरोधात व्यापारी महासंघाने प्रथमच कडक भूमिका घेतली आहे व प्रशासनाला चोवीस तासांची मुदत दिली आहे
त्यामुळे प्रशासनाला याची दखल घ्यावी लागणार आहे याबाबत प्रशासन कोणता निर्णय घेणार हे लवकरच स्पष्ट होईल जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतील व्यापारी संघटनांनी याबाबत आपली भूमिका अद्याप तरी जाहीर केलेली नाही तसेच यामध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे व्यापाऱ्यांची बाजू ऐकून त्याबाबत त्यांना दिलासा देणारा निर्णय घेणार का याकडे आता लक्ष लागले आहे
www.konkantoday.com