जेष्ठ संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांचे निधन
मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, विश्वस्त, जेष्ठ संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर (८२, मूळ रा. आरोंदा, ता. सावंतवाडी) यांचं आज सकाळी दुःखद निधन झालं आहे. मुंबईतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेऊन कोरोनामुक्त होऊन ते घरी परतले होते. त्यानंतर अचानक काल रात्री त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं.काही दिवसांपूर्वीच राधाकृष्ण नार्वेकर यांच्या पत्नी क्षमा नार्वेकर यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. राधाकृष्ण नार्वेकर ज्येष्ठ पत्रकार तसेच मुंबई सकाळचे माजी संपादक होते.
www.konkantoday.com