
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे ऑनलाइन दर्शन
वाघाची डरकाळी, बिबटय़ांचा रुबाब, अस्वलाची नजाकत आणि हत्तिणीच्या डौलासह हरण, कोल्हे, तरस अशा जंगली प्राण्यांसह शेकडो रंगीबेरंगी पक्षी, फुलपाखरे, झाडे पाहण्याची संधी आता सर्वांनाच मिळणार आहे. निमित्त आहे पालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या ‘व्हर्च्युअल सहल’ उपक्रमाचे. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते पालिकेच्या या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या प्रभावामुळे उद्यान पर्यटकांसाठी बराच काळ बंद राहिले. त्यामुळे पर्यटकांची पहिली पसंती असणाऱया वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे ऑनलाइन दर्शन घडवावे, अशी मागणीही केली जात होती. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून ‘व्हर्च्युअल सहल’ उपक्रम सुरू करण्यात आला द मुंबई झू’ या नावाने असलेल्या सोशल मीडियावर ‘प्राणिसंग्रहालयाच्या व्हर्च्युअल टूर’ ची ध्वनिचित्रफीत सर्वांना पाहता येणार आहे
www.konkantoday.com




