
महामार्ग पोलिसांच्या ‘मृत्युंजय दूत’ संकल्पनेमुळे अनेकांचे प्राण वाचले
राज्यातील महामार्गावर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना तात्काळ प्रथमोपचार उपलब्ध होऊन त्यांचे प्राण वाचावे यासाठी महामार्ग पोलिसांनी ‘मृत्युंजय दूत’ संकल्पना राबविली आहे. महामार्गालगतच्या गावातील ग्रामस्थ, पेट्रोल पंप व ढाब्यावर काम करणारे कर्मचारी, सामाजिक संस्था आदींचा समावेश असलेल्या या मृत्युंजय दूतांनी गेल्या अडीच महिन्यांत २५० अपघातग्रस्तांचे प्राण वाचविले आहेत.
www.konkantoday.com