भोस्ते घाटात शाम्पूच्या टँकरला अपघात;; वाहतूक ठप्प
मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात शाम्पू वाहून नेण्याऱ्या टँकरला झालेल्या अपघातात ट्रक चालक जखमी झाला. या अपघातानंतर टँकर मधील शाम्पू रस्त्यावर वाहू लागल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. रस्त्यावरून वाहणाऱ्या शाम्पूवरून वाहने सरकू लागल्याने मदतीसाठी पोहचलेल्या मदत ग्रुपच्या सदस्यांना अपघात स्थळापर्यंत पोहचणे अवघड झाले होते. तरीही मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी हे घटनास्थळापर्यंत रुग्णविषक घेऊन पोहचले. अपघातात जखमी झालेल्या चालकाला रुग्णवाहिकेतून खेड येथील मधुसिद्दी रुग्णलायत दाखल केले. दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
www.konkantoday.com
पहा ….