प्राणवायूचे उत्पादनात दहा पटीने वाढ -पंतप्रधान नरेंद्र मोदी
देश करोना विषाणू साथीशी सर्वशक्तीनिशी लढत असल्याचे नमूद करीत, प्राणवायूचे उत्पादन दहा पटीने वाढवण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात सांगितले.
करोनासाथीच्या दुसऱ्या लाटेत अनेक राज्यांपुढे प्राणवायूच्या तुटवडय़ाचे संकट उभे राहिले. प्राणवायूअभावी अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले. त्या अनुषंगाने पंतप्रधान म्हणाले की आता प्राणवायूचे उत्पादन आधीपेक्षा दहा पटींहून अधिक वाढवण्यात आले आहे. पूर्वी ते प्रतिदिन ९०० मेट्रिक टन एवढे होते, आता ते ९५०० मेट्रिक टन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com