
दापोली आगारातर्फे नियमावलींचे पालन करून बोरिवली, नालासोपारा येथे बस फेऱ्यांची सुरुवात
प्रवाशांच्या सेवेसाठी दापोली आगारातर्फे कोविड- १९ आरोग्यविषयक सर्व नियमावलींचे पालन करून बोरिवली, नालासोपारा या फेऱ्या २४ मेपासून सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागांमध्ये दाभोळ तसेच खेड, मंडणगड अशी बससेवा सुरू असल्याचे दापोलीच्या आगार व्यवस्थापिका रेश्मा मधाळे यांनी सांगितले.
आगारातर्फे रात्री १० वाजता दापोली- बोरिवली, रात्री १० वाजता बोरिवली- दापोली, रात्री ९.३० वाजता दापोली- नालासोपारा, सकाळी ८.३० वाजता नालासोपारा-दापोली या वेळेत गाड्या सोडण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेमधील आणि गरजू प्रवाशांनी या फेऱ्यांचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासन रत्नागिरी विभाग राज्य परिवहन महामंडळ यांच्याकडून करण्यात आले आहे.
www.konkantoday.com