
जनशताब्दी एक्स्प्रेस धावणार नव्या रंगरूपात
कोकण रेल्वे मार्गावर धावणारी दादर- मडगाव ही जनशताब्दी एक्स्प्रेस येत्या दि. १०जूनपासून नव्या रंगरूपात धावणार आहे. या आधी दोन वर्षांपासून कोकणकन्या तसेच मांडवी एक्स्प्रेस कोकणवासीयांच्या पसंतीच्या दोन गाड्यांचे जुने आसीएफ रेक बदलून त्या अधिक क्षमतेच्या आधुनिक टच देण्यात आलेल्या एलएचबी डब्यांसह धावू लागल्या आहेत.
या पाठोपाठ आता कोकण रेल्वे मार्गावर धावणारी जनशताब्दी एक्स्प्रेस देखील एलएचबी तंत्रज्ञानाने बनवलेल्या १६कोचसह धावणार आहे. येत्या १० जूनपासून कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक लागू होत असल्याने या दिवसापासून ही गाडी नव्या रंगरुपात सोडण्यात दादर ऐवजी सीएसटी ते मडगाव अशी धावणार आहे.
नव्या रंगरुपात धावणार्या सीएसटी – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला खास पर्यटकांसाठी जोडण्यात येण्यात येणारा विस्टा डोम कोचही जोडण्यात येणार आहे.
www.konkantoday.com