
रत्नागिरीतील महिला रुग्णालयामधील 200 खाटांच्या दुसर्या फेजचा ऑनलाईन प्रारंभ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते
रत्नागिरीतील महिला रुग्णालयामधील 200 खाटांच्या दुसर्या फेजचा ऑनलाईन प्रारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज रविवारी होत आहे. त्यामुळे कोव्हिड रुग्णांना या ठिकाणी अद्ययावत सुविधा उपलब्ध होणार आहेत. महिला रुग्णालयातील खाटांची क्षमता वाढणार आहे. दोनशे खाटांमध्ये ऑक्सिजन बेडसह व्हेंटिलेटर बेडमध्येही वाढ होणार आहे. महिला रुग्णालयाप्रमाणेच ओणी येथील 30 बेडच्या डेडीकेटेट कोव्हिड केअर सेंटरचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. आमदार राजन साळवी यांच्या आमदार फंडामधून हे कोरोना सेंटर उभे राहिले आहे
www.konkantoday.com