महाराष्ट्रापाठोपाठ मुंबईतही पेट्रोलने शतक ठोकले
मुंबईत पेट्रोलच्या दराने शनिवारी शंभरी पार केली. मुंबईत पेट्रोल १०० रुपये १९ पैसे, तर डिझेल ९२ रुपये १७ पैसे झाले आहे. पेट्रोलच्या दरात लिटरमागे २६ पैसे, तर डिझेल दरात २८ पैसै वाढ करण्यात आल्याचे सरकारी इंधन कंपन्यांनी जाहीर केले. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पेट्रोलचे दर आधीच शंभरीपार गेले होते. आता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलदर शंभरीपार गेले आहेत. पेट्रोलचे दर मुंबईत १०० रुपये १९ पैसे झाले असून डिझेलचे दर ९२ रुपये १७ पैसे झाले आहेत.
www.konkantoday.com