फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनकडून देवरुख मातृमंदिर संस्थेला मदत
फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनने एक पाऊल पुढे टाकत देवरुख मातृमंदिर संस्थेला ५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर(10 लिटर प्रति मिनिट ऑपरेटिंग लोड) देणगी स्वरूपात देण्यात आले. सध्या देशभरात कोविड १९ रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गावागावात कोविड सेंटर चालू करण्यात आली आहेत. याचाच एक भाग म्हणून चिपळूण संगमेश्वरचे आमदार श्री. शेखर निकम यांनी फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनकडे देवरुख मातृमंदिर संस्थेला वैद्यकीय उपकरणांची मागणी केली होती. ही मागणी मुकुल माधव फाउंडेशनच्या विश्वस्थ सौ. रितू प्रकाश छाब्रिया यांनी लगेचच मान्य करून २८ मे रोजी देवरुख मातृमंदिर कोविड सेंटर यांच्याकडे ५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुपूर्त केले.
या कार्यक्रमास चिपळूण संगमेश्वरचे लोकप्रिय आमदार श्री. शेखर निकम, श्री अभिजीत हेगशेट्ये (मातृमंदिर ट्रस्टचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते), तहसीलदार श्री. थोरात, बी.डी.ओ श्री. रेवणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपरिषद, देवरुख श्री बालाजी लोंडे आणि मातृ मंदिराचे विश्वस्त व फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
मातृमंदिर ही एक सामाजिक संस्था असून हि १९५४ मध्ये स्थापन केली गेली आहे . देवरूख तालुक्यातील गरजू ग्रामस्थांना आरोग्यसेवेसह सामाजिक सेवा पुरविते. मातृमंदिरने जवळपासच्या खेड्यांसाठी कमी खर्चात 30 बेडसाठी कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. याचा आजूबाजूच्या गावांना चांगला फायदा होत आहे.
यापूर्वी फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनने जिल्हा प्रशासनाला कोविड काळात 16 सुसज्ज आयसीयू बेड, १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर,सलाईन स्टँड, मल्टीपारा मॉनिटर, व्हेंटिलेटर, पीपीई किट्स आणि HFNO मशीन दिले आहेत.
आमदार श्री. शेखर निकम आणि श्री. हेगशेट्ये यांनी फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनचे आभार मानले आणि कोविड साथीच्या कठीण काळात दिलेल्या पाठिंब्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.
www.konkantoday.com