जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या मागणीला यश
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हयाच्या आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री ना. श्री.अनिल परब यांच्या उपस्थितीत दुरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली होती. या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी काही दिवसापूर्वी वस्तुस्थिती मांडली होती जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असलेल्या रुग्णवाहिका सुस्थितीत नाहीत, तातडीच्या वेळी जिल्ह्याच्या बाहेर एखाद्या रुग्णास नेण्याची वेळ आली तर या गाड्या पळू शकत नाहीत, १०८ रुग्णवाहिका उपलब्ध असली तरी तिच्यावर ताण असतो. त्यामुळे जिल्ह्यासाठी नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात,त्याची दखल घेऊन मा. पालकमंत्री साहेब यांनी राज्य शासनाकडून ७ आणि खनिकर्म विभागाकडून ९ अशा एकूण १६ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. त्यांचा लोकार्पण सोहळा मा.श्री.अनिलजी परब यांच्या हस्ते दुरचित्र प्रणाली द्वारे वर्च्युअली तर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.श्री. उदयजी सामंत यांच्या हस्ते फित कापून व लांजा-राजापूर मतदारसंघाचे आमदार श्री. राजनजी साळवी यांच्या हस्ते नुकतंच पार पडला होता जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम सुरू करताच हे मोठे काम माझ्या माध्यमातून होऊ शकले, याचा मला अतिशय आनंद होत आहे.अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी दिली.
www.konkantoday.com