रत्नागिरी शहरात निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे रस्त्यात वाहने रुतली तरी काळजी करू नका ,नवी सुविधा
रत्नागिरी शहरातील नागरिकांना पाणी पुरविण्यासाठी नव्या पाणी योजनेचे काम गेले कित्येक महिने चालू आहे त्यासाठी शहरातील विविध भागात चर खोदण्यात आल्या आहेत आता रस्त्यावर चिखल होईल म्हणून घाईघाईने याच चरांवर माती टाकून डांबरीकरणाचे काम सुरू आहे पण ते करताना काम दर्जेदार व नियमाप्रमाणे होत आहे की नाही यावर नगर परिषद प्रशासनाचा त्यावर कोणताही अंकुश नाही त्यामुळे अनेकवेळा प्रशासनाने कानाडोळा केला तरी कामाचा दर्जा आपोआप उघड होतो असाच प्रकार झाडगाव येथील सरवणकर ते पोटफोडे गल्ली या भागात घडला आहे दोन महिन्यांपूर्वी या भागात पाइपलाइनसाठी रस्ता खोदण्यात आला यानंतर या चरावर कोणतीही उपाययोजना झाली नाही त्यामुळे मध्यंतरी पडलेल्या पावसाने शहरातील माती सर्वत्र रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाले या प्रकारामुळे रस्त्यावरून दुचाकी वाहने हाकणेही मुश्किल झाले त्यामुळे पाईपलाईनसाठी खोदलेले चर दगड घालून बुजवावेत अशी मागणी त्या भागातील ग्रामस्थांनी केली मात्र कंत्राटदाराने आहे ती माती ढकलून वरती खडीकरण करून डांबरीकरण केले या भागात कचरा गोळा करण्यासाठी नगरपरिषदेची गाडी आली आणि नव्याने केलेल्या खडीकरणात एवढी फसली गाडीचे एक चाक चरात रुतून बसले आता कचरा भरलेली गाडीचे चाक बाहेर काढायचे कसे हा प्रश्न पडला असतानाच त्यासाठी लगेच नामी शक्कल लढवण्यात आली डांबरीकरणासाठी आलेल्या रोलरने धक्का देऊन ही कचरागाडी रुतलेल्या भागातून बाहेर काढण्यात आली शहरात सुरू असलेल्या साईडपट्ट्यांचे काम दर्जाहीन होत असल्याची तक्रार याआधी समविचारी मंच या संघटनेने केली होती आता निकृष्ट कामाबाबत
नगर परिषदेच्या विरोधी पक्षाने आवाज उठवायचा असतो परंतु तीच मंडळी अशा कंत्राटांमध्ये असल्याने आता कोणी कुणाविरूध्द आवाज उठवायचा हा प्रश्नच आहे असे असले तरी आता रत्नागिरीकरांनी घाबरुन जायचे कारण नाही अशा काही निकृष्ट दर्जाच्या कामामुळे चुकून तुमची गाडी रस्त्यात कुठे रुतली तर नगरपरिषदेकडे तुमची गाडी बाहेर काढण्याचा नवा पर्यायही उपलब्ध आहे
www.konkantoday.com