कोरोनाबाधितांची संख्या घटली; प्रशासनाची डोकेदुखी कमी

खेड : नागरिकांचे जगणे असह्य केलेल्या कोरोनाने हळुहळु तालुक्यातून काढता पाय घ्यायला सुरवात केली आहे. गेले काही दिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी काही अंशी कमी झाली आहे. तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून तब्बल ८३८ कंटेनमेंट झोन कार्यान्वित करावे लागले होते. मात्र आता ही संख्या ३५ वर आली आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. या लाटेचा परिणाम शहरी भागापेक्षा ग्रामीण भागावर जास्त झाला. तालुक्यातील सुमारे २०० गावांमध्ये कोरोना पसरल्याने अनेकांना याची झळ पोहचली. ज्यांना वेळेत उपचार मिळाले ते या रोगातून वाचले मात्र ज्यांनी हा रोग अंगावर काढला, किंवा त्यांना वेळेत उपचार मिळाले नाहीत त्यांना मात्र आपला जीव गमवावा लागला. ३० ते ४० या वयोगटातील काहीजणांचा गेलेला बळी अनेकांना चटका लावणारा
होता. वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी तालुका प्रशासनाने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या, कंटेनमेंट झोन ही त्या पैकीच एक उपाययोजना होती. तालुका आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात तब्बल 838 ठिकाणी कंटेनमेंट करण्या आले होते. त्यामुळे येथील ग्रामस्थांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले होते.
मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असल्याने कंटेनमेंट झोन कमी होवू लागले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यात ३५ कंटेनमेंट झोन असून अॅक्टिव रुग्णांची संख्या २७४ इतकी आहे. त्यापैकी होम आयशोलेशनमध्ये १५८ रुग्ण उपचार घेत आहेत.
तालुक्यात एकूण ३२२९ जणांना कोरोनाची बाधा झालेली होती मात्र ३४०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. ज्या रुग्णांनी कोरोनावर मात केली त्यापैकी काही जणांना म्युकरमायकोसिस या रोगाने पछाडले आहे. त्यामुळे त्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे.
कोरोनाची दुसरी लाट हळुहळु ओसरू लागली असली तरी कोरोना अद्याप गेलेला नाही तो जाईल अशी शक्यताही नाही त्यामुळे नागरिकांची स्वत:ची आणि त्याचबरोबर दुसऱ्याचीही काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. शासनाने घालून दिलेले निबंध प्रत्येक नागरिकासाठी बंधनकारक आहेत. ते निर्बंध तोडू नयेत अन्यथा कारवाईचा बडगा उगारला जाईल असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button