राज्यातील ३६ पैकी ३० जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या किमतीची शंभरीपार
सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलमध्ये करण्यात आलेल्या चालू महिन्यातील १४ व्या दरवाढीने इंधनाच्या किमतींनी गुरुवारी विक्रमी उच्चांकाला गवसणी घातली. राज्यातील ३६ पैकी ३० जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या किमतीने शंभरीपार मजल मारली असून, याला अपवाद ठरलेल्या मुंबई, पुणे, नाशिक, वर्धा, चंद्रपूर आणि पालघरमध्येही किमती शंभरीच्या वेशीवर आहेत. करोनामुळे आर्थिक विवंचनांचा सामना करावा लागत असलेल्या सामान्य जनांवर महागाईचे नवे संकट यातून उभे ठाकले आहे.
www.konkantoday.com