
दारूबंदी उठवण्याचा राज्य सरकारचा निर्णय अयोग्य आणि दुर्दैवी-पद्मश्री डॉ. अभय बंग आणि डॉ.राणी बंग
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. गडचिरोली, चंद्रपूर भागात आदिवासींच्या आरोग्यावर काम करणाऱ्या पद्मश्री डॉ. अभय बंग आणि डॉ.राणी बंग यांनी हा चंद्रपूरसाठी काळा दिवस असल्याचं मत व्यक्त केलं. तसेच हे दारुबंदीचं अपयशी आहे की मंत्री-शासन असा प्रश्नही उपस्थित केलाय. दारूबंदी उठवण्याचा राज्य सरकारचा निर्णय अयोग्य आणि दुर्दैवी असल्याचंही त्यांनी नमूद केलं. अभय बंग म्हणाले, “जिल्ह्यातील 1 लाख महिलांचे आंदोलन, 585 ग्रामपंचायती व जिल्हापरिषदांचा ठराव यामुळे शासनाने 6 वर्षांपूर्वी दारूबंदीचा निर्णय घेतला होता. त्या दारूबंदीची अंमलबजावणी पुरेसी झाली नाही हे अगदी खरं आहे. पण सरकारच्या कोणत्या योजनेची आणि कायद्याची अंमलबजावणी 100 टक्के होते? मग या सर्व योजना-कायदे रद्द करणार का? शासनाला कोरोना नियंत्रण नीट करता येत नाही. म्हणून कोरोना नियंत्रणाचं कामही थांबवणार का?”
www.konkantoday.com