
कोरोनाची वाढती संख्या बघता नेवरे ग्रामपंचायत व ग्राम कृती दल यांनी जाहीर केला जनता कर्फ्यू
रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायत नेवरे कार्यक्षेत्रात कोरोना पॉजिटीव्ह असेलेले रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्या साठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रविवारदिनांक ३०/०५/२०२१ रात्री १२.०० वा. पासून ते शुक्रवार दिनांक ०४/०६/२०२१ रात्री ठिक १२.०० वा. पर्यंत संपुर्णसंचारबंदी करण्याचे तसेच गावातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचे ग्रामकृतीदल समिती नेवरे, व्यापारी प्रतिनिधी,ग्रामपंचायत नेवरे यांच्या दिनांक २८/०५/२०२१ रोजीच्या सभेत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नेवरे ग्रामपंचायत कार्य क्षेत्रातील सर्व दुकाने बंद राहतील. तसेच या दिवसात संपूर्ण संचारबंदी राहील.
ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व वाडीतील सर्व ग्रामस्थांनी खालील
दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
रविवार दिनांक ३०/०५/२०२१ रात्री १२.०० पासून ते शुक्रवार दिनांक
०४/०६/२०२१ रात्री ठिक १२.०० पर्यंत संचारबंदी मधील अटी/शर्ती
दूध वितरण सकाळी ०८.०० ते सकाळी ०९.०० पर्यंत चालू राहील.
मेडिकल स्टोअर्स सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० पर्यंत चालू राहील.
आवश्यक सेवा व्यतिरिक्त रिक्षा बंद राहतील.विनामास्क फिरणाऱ्यांवर रु.२००/- दंड आकारण्यात येईल,
सर्व दुकाने बंद राहतील.नेवरे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांना पूर्णत: बंदी राहणार आहे
www.konkantoday.com