
कोकण परप्रांतियांच्या घशात घालण्याचा सत्ताधार्यांचा डाव, विनायक राऊत यांचा आरोप
कोकण म्हणजे सोन्याची अंडी देणारी भूमी, असे भाजपच्या लोकांना वाटत आहे. त्यामुळे कोकणभूमी परप्रांतीयांच्या घशात घालण्याचे काम भाजप करीत आहे. कोकण किनारपट्टीवरील अनेक गावांवर सिडकोचे प्रशासन लादण्याचा जीआर या सरकारने काढण्याचे पाप केले आहे. ग्र्रामपंचायतींचे अधिकार काढून घेवून अनेक गावे परप्रांतीयांच्या घशात घालण्याचा घाट सरकारने घातला आहे. सिडकोच्या जीआरला सत्तेतील कोकणातील एकाही मंत्री, आमदाराने विरोध केला नाही, यातच त्यांचे इमान दिसून येत आहे. कोकण ही आमची भूमी आहे. आमच्या पूर्वजांची आहे, असे प्रतिपादन लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांनी वेंगुर्ले येथे केले.www.konkantoday.com