आता मराठी भाषेतून इंजिनिरिंगचे शिक्षण शक्य
इंजिनीयरिंगचे शिक्षण हे बहुतांशी इंग्रजी भाषेमध्येच आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांना ही इंग्रजी अवघड वाटते. त्यामुळे इंजिनीयरिंगमध्ये त्यांचे प्रमाण कमी असते. पण आता इंजिनीयर होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) महाविद्यालयांना मराठीसह आठ प्रादेशिक भाषांमधून इंजिनीयरिंगचे पदवी शिक्षण देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मराठीतूनही इंजिनीयर होता येणार आहे.
एआयसीटीईने मराठी भाषेबरोबरच हिंदी, बंगाली, तेलगू, तमीळ, गुजराती, कन्नड आणि मल्याळम भाषेमध्येही इंजिनीयरिंगचे पदवी शिक्षण देण्यास हिरवा कंदील दिला आहे
www.konkantoday.com