अँटीकरप्शन विभागाच्या नावाने तोतयागिरी करणाऱ्या टोळक्याला अटक

गुहागर तालुक्यातील खाडीपट्टी भागातील वेळणेश्वर, अडूर,
बोऱ्या भागात शासनाचे आदेश असतानाही तुम्हीनियमांविरुद्ध दुकान उघडे का ठेवले?” असं धमकावून दुकानदारांना लुटणाऱ्या तिघांना अटककरण्यातआलीआहे .अँटीकरप्शन विभागाच्या नावाने तोतयागिरी सुरु असल्याच्याअनेक तक्रारी रत्नागिरीतील गुहागर तालुक्यात करण्यातआल्या होत्या. नॅशनल अँटीकरप्शन कमिटीच्या तोतया रत्नागिरी जिल्हाध्यक्षासह तिघांना अटक केल्याने संपूर्णरत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडालीआहे. गुहागर तालुक्यातील खाडीपट्टी भागातील वेळणेश्वर, अडूर,
बोऱ्या भागात गेल्या दोन दिवसापासून हा प्रकार सुरु होता.तुमचं दुकान अनधिकृतपणे सुरु आहे. तुमच्या दुकानात दारुविकली जाते, शासनाचे आदेश असतानाही तुम्ही नियमांविरुद्ध
दुकान उघडे का ठेवले? आम्ही अँटी करप्शन ऑफिसकडूनआलो आहोत. तुमच्याबाबत काही तक्रारी आल्या आहेत. त्याजर मिटवायच्या असतील तर आम्हाला पैसे द्या” असे सांगत पाचते दहा हजार रुपये घेत या टोळक्याने अनेकांना गंडवले होते.
याबाबतच्या तक्रारी काल दिवसभरात गुहागर पोलीस स्टेशनयेथे दाखल झाल्या होत्या. यावेळी पोलीस निरीक्षक अरविंदबोडके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तपास करत या तोतयागिरी करणाऱ्या पथकातील तिघांना ताब्यात घेतले.
अँटिकरप्शनच्या नावाने तोतयागिरी करणारे हे तिघे जणचिपळूण तालुक्यातील रहिवाशी आहेत.
त्यांनी अशाच प्रकारे अनेक ठिकाणी लुटल्याचे समोर आले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button