
५०टक्के नागरिकांचं लसीकरण झालं तरच लॉकडाऊन उठू शकतो- कॅबिनेट मंत्री अस्लम शेख
५०टक्के नागरिकांचं लसीकरण झालं तरच लॉकडाऊन उठू शकतो , असं वक्तव्य कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांनी केलं आहे. लॉकडाऊन एकदम उघडला जाणार नाही, परंतु सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा विचार नक्की करण्यात येईल असं त्यांनी म्हटलं आहे. कॅबिनेट बैठकीत याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. हॉटेल, सलून व्यावसायिक, इलेक्ट्रिक दुकानांना दिलासा देण्याचा निर्णय टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री घेतील असंही अस्लम शेख म्हणाले आहेत.
www.konkantoday.com