सर्व नेत्यांनी मराठा समजाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे-खासदार छत्रपती संभाजीराजे
मराठा आरक्षणावरुन भाजपा खासदार छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. संभाजीराजे यांनी आपण महाराष्ट्राचा दौरा करणार असून नेमकी परिस्थिती समजून घेणार आहोत, तसंच राजकीय नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार संभाजीराजे गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. संभाजीराजे आणि शरद पवार यांच्यात १५ मिनिटं चर्चा झाली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजीराजे यांनी सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं. सर्व नेत्यांनी मराठा समजाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे अशी मागणी यावेळी त्यांनी केली
www.konkantoday.com