जेष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग व रत्नागिरीतील उद्योजक सौरभशेठ मलूष्टे यांच्या संयुक्त विद्यमाने फिरते लसीकरण केंद्र सुरू

जेष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी लसीकरण सुलभ व्हावे म्हणून जिल्हा परिषद आरोग्य विभाग व रत्नागिरीतील उद्योजक सौरभशेठ मलूष्टे यांच्या संयुक्त विद्यमाने फिरते लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन जिल्हापरिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हापरिषद उपाध्यक्ष उदय बने, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी घाणेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी बबिता कमलापूरकर, उद्योजक सौरभशेठ मलूष्टे, समाजकल्याण सभापती परशुराम कदम, महिला बालकल्याण सभापती भारती सरवणकर, तालुका आरोग्यधिकारी गावडे आदी उपस्थित होते. सामाजिक करण्यात आघाडीवर असलेले सौरभ मलूष्टे यांनी ही संकल्पना व जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दाखवताच जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड व आरोग्य सभापती उदय बने यांनी या संकल्पनेला तत्काळ मंजुरी दिली. रत्नागिरी शहरातील विविध भागात जाऊन ही लसीकरण व्हॅन जेष्ठ नागरिकांना आणि दिव्यांगाना लसीकरण सुविधा उपलब्ध करून देणार आहे. लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी सौरभ मलूष्टे यांनी मोफत रिक्षाचा उपक्रमही राबविला होता
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button