जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही वीजग्राहकांचा अद्यापही वीजपुरवठा खंडित
चक्रीवादळामुळे महावितरणचे मोठे नुकसान झाले होते अनेक ठिकाणी पोल व तारा पडल्या होत्या महावितरणने जिल्ह्यातील विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी परिश्रम घेतले व बऱ्याचशा भागातील विद्युत पुरवठा सुरळीत केला मात्र अद्यापही जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी विद्युत पुरवठा दहा बारा दिवस उलटूनही सुरू झालेला नाही
लांजा तालुक्यातील हर्चे येथे वादळामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्याने अद्याप पर्यंत हर्चे शेळवी वाडी दहा दिवस काळोखात आहे संमंधित विभागाशी संपर्क साधला असता आमचे प्रयत्न चालू आहेत असे सांगितले जातय हीच परिस्थिती रत्नागिरी जिल्ह्यातील काही ग्रामीण भागात आहे ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी खाजगी कंत्राटदारांची मदत घेतली जात आहे मात्र या कंत्राटदारांकडून व्यवस्थित उत्तरे दिली जात नसल्याची तक्रारी आहेत त्यामुळे शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही तातडीने महावितरणने लक्ष घालून या ठिकाणी वाड्यांमध्ये व अन्य ठिकाणी अद्यापही विद्युत पुरवठा खंडित झाला आहे त्याठिकाणी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे
www.konkantoday.com