
संघटना आणखी मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करूया आणि आपला भगवा झेंडा असाच डौलाने फडकत ठेवूया-शिवसेना उपनेते उदय सामंत
शिवसेनेचा चौपन्नावा वर्धापन दिनाच्या निमित्ताने रत्नागिरी, संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी मार्गदर्शन करताना मंत्री महोदय उदय सामंत यांनी सर्वप्रथम सर्व शिवसैनिकांनी कोरोनवर मात करण्यासाठी आपल्या गावात दिलेल्या योगदानाबद्दल अभिनंदन केले.वर्धापन दिन साजरा करत असताना शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी कोरोना संकटांवर मात करण्यासाठी केलेल्या अभूतपूर्व कामगिरीची माहिती जनतेला द्यावी तसेच नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळ आणि त्यात झालेल्या हानीची भरपाई करण्यासाठी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयांची माहितीही जनतेला द्यावी असे आवाहन केले. या पुढे संघटना आणखी मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करूया आणि आपला भगवा झेंडा असाच डौलाने फडकत ठेवूया असे सांगत मंत्री महोदयांनी सर्व शिवसैनिक आपापल्या गावात वर्धापन दिन साजरा करतील आणि काही मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रत्नागिरी मधील कार्यालयात कार्यक्रम होतील असे सांगितले.
या बैठकीला सह संपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, जिल्हा महिला संघटक वेदा ताई फडके, विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रमोद शेरे, तालुका प्रमुख बंड्या शेठ साळवी, संगमेश्वर तालुका प्रमुख प्रमोद पवार, रत्नागिरी शहर प्रमुख बिपीन बंदरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने,बांधकाम आणि आरोग्य सभापती बाबूशेठ म्हाप इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
www.konkantoday.com




