रत्नागिरी शहरा जवळील काळबादेवी येथे दोन दिवसांपूर्वी पांढरा कावळा प्रसिद्ध झाला असतानाच आता काळबादेवी येथील एका मच्छिमाराला सापडला दीडशे किलोचा वाघळी मासा

रत्नागिरी शहरा जवळील काळबादेवी येथे दोन दिवसांपूर्वी पांढरा कावळा प्रसिद्ध झाला असतानाच आता शहराजवळील काळबादेवी येथीलएका मच्छिमाराला आतापर्यंतची सर्वात मोठी सुमारे दीडशे किलोची वाघळी मासा सापडला.. मात्र ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाघळीसमजली जात आहे.
तौक्ते चक्रीवादळा मुळे समुद्रात उलथापालथ झाली असून मासळी समुद्रातून गायबझाली. छोटे मच्छिमार किनाऱ्यापासून काही अंतरावर मिळेल तेमासे पदरात पडून घरी परत येत आहेत. काळबादेवी येथील
मच्छिमार संदेश मयेकर यांचं नशीब जोरावर होतं.सकाळी मिऱ्या पासून काही अंतरावर तांडेल निकेत मयेकर
यांच्यासह ही नौका मासेमारी करत होती. फारसा मासा मिळतनव्हता. ते माघारी फिरले. परत येताना जाळ टाकलं आणिअचानक जाळे
जड लागल्यामुळे काहीतरी मोठी मासळी लागल्याचा अंदाज त्यांनी केला जाळं पाण्याबाहेर ओढण्यास
सुरुवात केली आणि नौकेतील मच्छिमाराच्या चेहरा फुलून गेला.
मासळीची कमतरता असताना वाघळी माश्याचा लॉटरीचलागली होती.भराभर मासा पाण्याबाहेर काढला आणि तेकिनाऱ्यावर धावले. एवढा मोठा मासा विक्रीला न्यायचा म्हणजेगाडीशिवाय पर्याय नव्हता. छोटा टेम्पो मागवला. आकाराने
मोठी असलेली वाघळी त्या गाडीच्या हौद्यात टाकली. पूर्ण जागात्या एका माशाने भरून गेली
मिऱ्या येथे या माशाची विक्री झाल्याचे कळते सुमारे १५०किलोचा हा मासा ६ फूट बाय ७ फुटाचा असावाअसा अंदाज आहे मात्र एवढा मोठा मासा प्रथमचरत्नागिरीच्या किनारी सापडल्याचे मच्छिमारांनी सांगितले. यामाशाला बाजारात किलोला १७० रुपये दर मिळतो. या माशाला
चांगली मागणी आहे. सध्या वादळामुळे समुद्रात उलथापालथ झाल्याने हा मासा समुद्रकिनारी आला असावा असा अंदाज आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button