
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथे मातीच्या ढिगाऱ्यावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे शिंदेवाडी येथे सोमवारी रात्री महामार्ग बांधकामाच्या ठिकाणी ठेवलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात भोस्ते येथील सर्फराज हानिफ जसनाईक याचा मृत्यू झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर सर्फराज जसनाईक दि. २४ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास दुचाकी (एम एच ०८ ए एम १५८७) वरून कळंबणीहून खेडच्या दिशेने येत होता. महामार्गावरील भरणे शिंदेवाडी येथे महामार्ग चौपदरीकरण काम सुरू असलेल्या पुलाजवळ मातीच्या ढिगाऱ्यावर त्याची दुचाकी धडकून अपघात झाला. या अपघातात जसनाईक पुलावरून खाली कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली.घटनास्थळी पोहोचलेले सामाजिक कार्यकर्ते रहीम सईबोले यांच्यासह नागरिकांनी १०८ रुग्णवाहिका बोलावून जसनाईक याला कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चिपळूण येथे नेत असताना वाटेतच जसनाईक याचा मृत्यू झाला.
www.konkantoday.com