गोळपसडा येथे 20 बेड चे कोव्हीड सेंटर मजलिस-ए-फलाहे दारेन या संस्थेचा उपक्रम
मजलिस ए फलाहे दारेन या संस्थेतर्फे रत्नागिरी पावस मार्गावरील गोळपसडा येथे 20 बेड चे कोव्हीड सेंटर उभारण्यात आले असून त्याचे उदघाटन रविवार दि. 30 मे रोजी सकाळी 10:30 वाजता,उच्च व तंत्रशिक्षण शिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा,पोलिस अधीक्षक डॉ. मोहीत कुमार गर्ग यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याचे संस्थेचे प्रमुख मन्सूर काझी,रफीक बिजापुरी मौलाना अब्दुल शकूर खान,एजाज खान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. या कोव्हीड केअर सेंटर मध्ये 10 जनरल व 10 आक्सिजन बेडची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. याचा पावस पंचक्रोशीतील पावस,गोळप,पुर्णगड, मेर्वी,गावखडी, फणसोप,आदी गावातील गरजु नागरिकांना उपयोग होणार आहे. या ठिकाणी ना नफा,ना तोटा बेसवर रुग्ण सेवा दिली जाणार आहे. हे कोव्हीड सेंटर येथील अरबी मद्रसा बंद करुन सामाजिक भावनेतुन हा उपक्रम सुरू करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
www.konkantoday.com