कोरोनाग्रस्त राष्ट्रीय खो-खो खेळाडूंना महाराष्ट्र खो-खो संघटनेमार्फत आर्थिक मदत देण्याचा निर्णय

कोरोनाग्रस्त राष्ट्रीय खो-खो खेळाडूंना महाराष्ट्र खो-खो संघटनेमार्फत आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने माहिती संघटनेकडे पाठविण्याचे आवाहन राज्य संघटनेचे सचिव अ‍ॅड. गोविंद शर्मा यांनी केले आहे.

कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कित्येक मध्यमवर्गातील कुटुंबाची दोनवेळच्या जेवणाची देखील आबाळ झाली आहे. राज्यातील अनेक राष्ट्रीय खो-खो खेळाडूंची कुटुंबे होरपळली आहेत.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही कोरोनाग्रस्त गरीब होतकरू खेळाडूंना आर्थिक मदत करण्याची भूमिका घेतली आहे.भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांनी खेळाडूंच्या आर्थिक परिस्थितीनुसार त्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button