रत्नागिरीपासून जवळ असलेल्या काळबादेवी गावात सफेद कावळ्याचे दर्शन
कावळा म्हटलं काळ्या रंगाचं कावळा आपल्या डोळ्यांसमोर येताे. पण कावळा सफेदही असतो असं कुणी म्हटलं तर विश्वास बसतनाही. पण एक पांढरा सफेद कावळा रत्नागिरीपासून जवळ असलेल्या काळबादेवी गावात शेट्येवाडीत आढळला. शेखर शेट्ये यांनी निरीक्षण
करुन ही वार्ता फोटोज, व्हीडीओद्वारे सगळीकडे पाठवली. गेलेचार दिवस शेट्ये यांच्या घराजवळ पांढऱ्या कावळ्याची हजेरी चर्चेचा विषय ठरला आहे.काळबादेवी येथील शेखर शेट्ये यांच्या घराजवळ पक्षी परिसरा तील झाडांवर आढळतात. चार दिवसांपूर्वी श्री. शेट्येघराच्या बाजूला असलेल्या कोंबड्यांना खाणं घालत असतानाकाही कावळे तिथे आले. त्यात एक पांढरा पक्षी दिसला. दाणेटिपणारा तो पक्षी कबुतर असावे असे वाटले. थोडे कुतूहलानेत्यांनी त्याचे निरीक्षण केल्यावर तो कावळाच वाटल. त्या पांढऱ्यापक्षाची ठेवण, चोच आणि डोळा हा नेहमीच्या कावळ्यासारखाचहोता. थोडावेळ थांबून त्यांनी आवाज ऐकला. तो कावळ्याच.शेखर यांनी पांढऱ्या कावळ्याची गोष्ट शेजारच्यांना सांगितली.सर्वच जणं त्याला पहायला आले. काहींनी छायाचित्रे काटा
सोशल मीडियावरही शेअर केली. त्यामुळे हा पांढरा कवळा आता चर्चेचा विषय झाला आहे
www.konkantoday.com