गुहागर तालुका मर्यादित पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

गुहागर विधानसभा समन्वयक विपुल लक्ष्मण कदम पुरस्कृत शिवसेना, युवा सेना आयोजित गुहागर तालुका मर्यादित पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ गुहागर तालुक्यातील शांताई रिसॉर्ट, पाटपन्हाळे येथे झाला. या स्पर्धेत सत्यवान दरेकर (परचुरी), मकरंद विचारे (वरवेली), समीर महाडिक, (वरवेली), सोहम पवार (देवघर), यश विजय गुजर (देवघर) यांना अनुक्रमे पहिले पाच क्रमांकाचे बक्षीस रोख पारितोषिक, सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे गुहागर विधानसभा समन्वयक विपुल कदम, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर, पक्ष निरीक्षक अनुराग उत्तेकर, युवा सेना जिल्हा समन्वयक अमरदीप परचुरे, गुहागर तालुका महिला प्रमुख ॲड. ज्योत्स्ना काताळकर, गुहागर शहर प्रमुख निलेश मोरे, प्रदीप सुर्वे, गुहागर विधानसभा ७२ गाव युवा सेना तालुका प्रमुख विक्रांत चव्हाण, अमोल गोयथळे, ॲड. संतोष आग्रे, सागर गुजर, महेश जामसुतकर, योगेश कदम, कुणाल देसाई, सुशील जंगम उपस्थित होते.
या ऑनलाइन सजावट स्पर्धेचे परीक्षण कमर्शियल आर्टिस्ट सत्यजित भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा सेना जिल्हा समन्वयक अमरदीप परचुरे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button