न्यु एरा प्रोडक्शन्स आणि मराठी रंगभूमी, रत्नागिरी यांनी तयार केलेली नवी सुरुवात ही शॉर्ट फिल्म नुकतीच युट्युब वर प्रदर्शित
न्यु एरा प्रोडक्शन्स आणि मराठी रंगभूमी, रत्नागिरी यांनी तयार केलेली नवी सुरुवात ही शॉर्ट फिल्म नुकतीच युट्युब वर प्रदर्शित झालीआहे कोरोनाच्या काळात नात्यांमधील
आपुलकीचा संदेश देणाऱ्या या शॉर्ट फिल्मला यु ट्यूबवरचांगलाच प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरीतील स्थानिक
कलाकारांनी एकत्र येत या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे.’नवी सुरुवात’ या शॉर्ट फिल्मचे लेखन स्वानंद मयेकर आणिप्रशांत पवार यांनी केले असून दिग्दर्शनाची जबाबदारी ओंकारपाटील यांनी सांभाळली आहे.कोरोनाचं दुःख विसरून आता हळूहळू सगळे आपापल्याकामाला लागत आहेत. मात्र या लॉकडाउनच्या काळात तयार
झालेली आपुलकीची भावना यापुढेही तशीच जोपासण्याचासंदेश या शॉर्ट फिल्मच्या मध्यमातून देण्यात आला आहे.७ मिनिटांच्या या शॉर्ट फिल्मचे कला दिग्दर्शन प्रवीण धुमक,छायांकन प्रसाद राणे यांनी तर पार्श्वसंगीत निखिल भुते यांनीकेले आहे. या शॉर्टफिल्ममध्ये रत्नागिरीतील प्रसिद्ध कलाकारअजित पाटील यांच्यासोबत सागर मायंगडे, स्वानंद मयेकर ,
सिद्धी लांजेकर, स्मितल चव्हाण त्याच बरोबर आयुश शिरसाठआणि आर्या धुमक या बाल कलाकारांनी अभिनय केला आहे.अल्फोनसो प्रोडक्शन या यु ट्युब चॅनेलवर नुकतीच ही शॉर्ट
फिल्म प्रसिद्ध करण्यात आली असून ही शॉर्ट फिल्म रत्नागिरीयेथील बसणी गावात चित्रीत झाली आहे. विजय गुरव, संतोषगार्डी आणि दुर्वेश सागवेकर यांचे मोलाचे सहकार्यही लाभलेआहे.
www.konkantoday.com