नाचणे तलावात एकाची आत्महत्या, तलावात मृतदेह तरंगताना आढळला
रत्नागिरी शहराजवळील नाचणे तलावात आज दुपारी मृतदेह तरंगताना आढळला आहे हा प्रकार आज दुपारी घडला असून सदर इसमाने तलावाच्या बाहेर चपला मोबाइल पाकीट व चिठ्ठी लिहून ठेवली होती या चिठ्ठीवर गजा टिळेकर असे नाव लिहिले असल्याचे कळते सदरच्या इसमाचे पानपट्टीचे दुकान असल्याचे कळते ग्रामपंचायतीच्या कर्मचार्यांनी मृतदेह बाहेर काढला आहे मात्र त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळलेले नाही
www.konkantoday.com