
कारण नसेल तर मुंबईकरांनी गावाला येऊ नये जिल्हाधिकारी यांचे आवाहन
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढणारी संख्या आणि मृत्यूचे प्रमाण पाहीले तर ती चिंताजनक गोष्ट ठरली आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे मुंबईतून चाकरमानी गावी येऊ लागले आहेत. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या गोष्टीची गंभीर दखल घेत कारण नसेल तर मुंबईकरांनी गावाला येऊ नये असे कळकळीचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे़.
मुंबईकरांनी कारण नसताना जिल्ह्यात येऊ नये असे आवाहन करताना जिल्ह्यात मुंबईसह इतर ठिकाणांहून येणाऱ्या व्यक्तींची चेकपोस्टवर तपासणी करण्यात येणार आहे़ असे त्यांनी सांगितले
www.konkantoday.com